राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती (NMMS) व "दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती online अर्ज भरणे सन - 2023-24


सन २०२३ २४ वर्षासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्ब घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती योजनेसाठी (NMMSS) राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP २.०) www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर  नवीन आणि नूतनीकरण अर्जाच्या ऑनलाइन नोंदणी व अर्ज भरण्यास १ ऑक्टोबर २०२३ पासून सुरवात झाली आहे. नवीन आणि नूतनीकरण नोंदणीची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत NMMSS परीक्षा (शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये निवड झालेल्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी 2023-24 शैक्षणिक वर्षाची इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी नवीन अर्जदार म्हणून आणि ९ वी १० वी. ११ वी उत्तीर्ण झालेल्या शिष्यवृत्ती धारकांनी स्वतःची नोंदणी आधार नुसार करावी लागेल. यापूर्वी शिष्यवृत्ती घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी दहावी, अकरावी आणि बारावीसाठी नूतनीकरण अर्जदार म्हणून स्वतःचे नूतनीकरण करावे लागेल 

      केंद्र शासनाच्या अपंग व्यक्तीचे सक्षमीकरण विभाग (DEPWD) मार्फत राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) द्वारे अपग विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती (इयत्ता ९ वी आणि १० वी शिष्यवृत्ती लागू केली आहे. NSP २.० पोर्टलवर विद्यार्थ्यांची नोंदणी 01 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झाली आहे. 

या योजनचे तपशील या विभागाच्या वेबसाइटवर ( www.depwd.gov.in) आणि राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (www.scholarships.gov.in वर उपलब्ध आहेत. नोंदणी आणि अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख पोर्टल 30 नोव्हेंबर 2023 आहे.

NMMSS साठी पात्रतेचे निकष

 १. पालकाचे उत्पन्न रु. ३,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे उत्पन्नाचा दाखला हा सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा आवश्यक आहे.

२. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित (टप्पा अनुदान सह) शाळेतील विद्यार्थाना सदर योजना लागू आहे.

३. केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय तसेच केंद्र / राज्य शासनाकडून वसतिगृहाची सवलत घेत असलेल्या शासकीय तसेचखाजगी विनाअनुदानित शाळेतील खाजगी अनुदानित सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत.

४. इयत्ता १० वी नंतर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांनि व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेत असल्यास शिष्यवृत्तीसाठी अपात्र करण्यात येईल.

५. इयत्ता १० वी मध्ये सर्वसाधारण (जनरल) विद्यार्थ्यास ६० टक्केपेक्षा अधिक गुण अनुसूचित जाती / जमातीच्या विद्या सुट) इयत्ता ९वी मधून १० वी मध्ये गेलेले विद्यार्थी व ११ वी मधून १२ वी मध्ये गेलेले विद्यार्थी प्रथम प्रयत्नात पास होणे आवश्यक आहे.

६. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेतील विद्यार्थ्यांच्या नावाचे खाते असावे संयुक्त खाते नसावे. 

७. शिष्यवृत्ती विद्यार्थ्याचे आधार कार्ड असावे व विद्यार्थ्याच्या बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न असावे. 

८. विद्यार्थ्यांची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे या प्रवर्गातून शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा व जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष : 

१. अनुदानित शाळातील इयत्ता ९वी व १० वी च्या दिव्यांग विद्यार्थ्यांना CWDs) प्रिमॅट्रिक शिष्यवृत्ती दिली जाते. 

२. सदर विद्यार्थ्याचे दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्के किंवा जास्त असावे. सक्षम अधिकाऱ्याचे दिव्यांगत्वाचे वैद्य प्रमाणपत्र है। Rights of Persons with Disabilities Act 2016 मध्येनिकषांनुसार असावे.

३. एकाच पाल्यांच्या २ पेक्षा अधिक अक्षम दिव्यांग पाल्यांना ही शिष्यवृत्ती लागू नाही. मात्र दुसरे अपत्य जुळे  असल्यास त्यांना सदर शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल. 

४. सदर शिष्यवृत्ती एका इयत्तेला एका शैक्षणिक वर्षासाठीच लागू राहील विद्यार्थ्यांने तीच इयत्ता रिपीट केल्यास या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही. विद्यार्थी नियमित असावा 

५. जर विद्यार्थ्याला एकापेक्षा जास्त शिष्यवृत्ती लागू होत असतील तर विद्यार्थ्याने त्याच्या सोयीनुसार (लाभाची) शिष्यवृत्ती स्विकारुन दुसरी शिष्यवृत्ती वरिष्ठ कार्यालयास कळवून रद्द करवून घ्यावी मात्र विद्यार्थी निवासासाठी देय अनुदान किंवा अशा प्रकारची राज्यशासनाची किंवा इतर स्त्रोतांकडून पुस्तकें किंवा साहित्य खरेदीसाठी प्राप्त मदत स्विकारू शकतात. 

६. शिष्यवृत्तीधारक जर केंद्रशासनाच्या किंवा राज्यशासनाच्या अर्थसहाय्यित परीक्षा केंद्रावर प्रशिक्षण घेत शिष्यवृत्ती सदर कालावधीसाठी बंद राहील. 

७. पालकाचे उत्पन्नाच्या सर्व स्त्रोतातून प्राप्त वार्षिक उत्पन्न रु २,५०,०० पेक्षा जास्त नसावे

शिष्यवृत्ती रक्कम

१. NMMSS साठी वार्षिक १२००० रुपये

२. दिव्यांग विद्यार्थीसाठी असलेली विद्यार्थ्यांसाठी प्री-मेट्रिक शिष्यवृत्ती वार्षिक १००० ते १४६०० रुपये

वेळापत्रक (NMMSS व प्री मैट्रिक शिष्यवृत्तीसाठी)


दोन्ही योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांनी विहित कालावधीत Online अर्ज भरणे आवश्यक.
Previous Post Next Post